रघुराम यांना कायम ठेवा – अर्थतज्ञ भगवती

bhagawati
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ आणि कोलंबिया विद्यापीठाचे प्रोफेसर जगदीश भगवती यांनी नरेंद्र मोदी यांना मिळालेला विजय थक्क करणारा असल्याचे मत व्यक्त करतानाच रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांना या पदावर कायम ठेवावे असा सल्ला नरेंद्र मोदींना दिला आहे.राजन अतिशय तल्लख आणि चतुर अर्थतज्ञ आहेत आणि त्यांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठाही आहे असे ते म्हणाले. याच बरोबर दर महिन्याला मोदींनी पत्रकार परिषद घेऊन सरकारचा अजेंडा त्यांच्यासमोर मांडावा असाही सल्ला दिला आहे.

एका परिषदेत बोलताना भगवती म्हणाले की मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची गाडी पुन्हा रूळावर येईल याचा विश्वास वाटतो मात्र माजी पंतप्रधानांप्रमाणे मोदींनी मौन धारण न करता दर महिना सरकारने काय केले आणि काय करणार आहे याची माहिती पत्रकरांना द्यावी, त्यांना आपल्या सोबत घ्यावे असा आमचा सल्ला आहे.अनेक बुद्धीमान अर्थतज्ञ मोदींसाठी काम करण्यास उत्सुक आहेत आणि त्यासाठी गरज असेल तर परदेशातून भारतात परतण्यासही तयार आहेत असेही भगवती यांनी सांगितले. स्वित्झर्लंड येथील एका परिषदेत ते बोलत होते.

Leave a Comment